चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया : झेकोस्लोव्हाकिया; चेकोस्लोवेन्स्का सोशॅलिस्टिका रिपब्लिका. मध्य यूरोपातील एक प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,२७,८७६ चौ. किमी.; पैकी स्लोव्हाकिया ४९,०१४ चौ. किमी. लोकसंख्या १,४४,८१,३०४ (जुलै १९७२), पैकी ४६,०१,८२३ स्लोव्हाकियात.